मनोगत

भाऊराव पाळेकर,अकोला





आदरणीय वेरुळकर सर सप्रेम नमस्कार राजमाता जिजाऊ सकल मराठा सोयरीक पुसद जिल्हा यवतमाळ या व्हॉटस् अप ग्रुपच्या माध्यमातून आजतागायत १८५ उपवर वधू मुला-मुलींचे विवाह जुळवणी चे कार्य अतिशय उत्तमरित्या पार पाडले आहेत. आणि याची आम्हा सर्व सभासदांना माहिती आहेच. याबद्दल आपले व आपल्या कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन. या सर्व कार्याची धुरा सांभाळीत असताना अतिश्रमाने प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होणे साहजिक आहे. त्यामुळे आपल्याला आरामाची खूप गरज आहे कारण " जर प्रकृती स्वास्थ उत्तम तर सर्वकाही काम उत्तम " याच उद्देशाने राजमाता जिजाऊ मराठा सोयरीक पुसद जिल्हा यवतमाळ या व्हाट्सअप ग्रुप मधील सर्व सभासदांनी आपल्यावरील कामाचा ताण कमी व्हावा, आपली प्रकृती स्वास्थ्य उत्तम रहावे, आणि आपले काम सुनियोजित व सुकर व्हावे या हेतूने वेबसाईट या योजनेची अंमलबजावणी करावी म्हणून या योजनेकडे आपले लक्ष वेधन्यात आले आहे. आणि ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित करावी म्हणून सर्व सभासदांची आग्रहाची विनंती आहे. आता सद्य परिस्थिती च्या लॉक डाऊन च्या काळात तर याची खूप गरज निर्माण झाली आहे. सर्व सभासद वर्ग आपल्या कडील वेबसाईटच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असून नोंदणी करण्यास सुद्धा अतिशय उत्सुक आहे. तसेच आपली ही वेबसाईट ईतर वेबसाईट पेक्षा निश्‍चितच चांगली होणार आहे. अतिशय सुटसुटीत आणि सर्व सामान्यांना समजेल आणि आर्थिक दृष्ट्या सर्वांना योग्य होईल अशीच होणार आहे. अशी आमची विचारधारा आहे. सर, जरी आमची उत्सुकता शिगेला पोहोचली असली तरी, प्रथम आपण आपल्या प्रकृती स्वास्थ्याकडे प्राधान्याने लक्ष केंद्रित करावे. आणि त्यानंतर आपण आम्ही सुचवलेल्या योजनेचा लवकरात लवकर विचार करावा. अशी आमची आग्रहाची विनंती आहे. ईश्र्वर आपणास व आपले कुटुंबीयास उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य प्रदान करो ही प्रभु चरणी प्रार्थना करतो ! धन्यवाद !

सुनील जगदीश काेकाटे



अकोला



आदरणीय सर, सस्नेह नमस्कार , काल माझ्या मुलीचे लग्न जुळले , आपल्या सारख्या समाजसेवेचा वसा घेतलेल्या व्यतिमत्व व आपले आशीर्वाद , सहकार्याने हे सर्व घडून आले , मी व माझा परिवार आपला ऋणी व आभारी आहे , आपल्या कडून सदैव इतर समाज बांधवाचे मुला-मुलींचे लग्न जुळावे हीच सदिच्छा करतो , आपल्या या महान कार्यास नमन करून भावी वाटचाली करीता सुभेच्छा देतो ......जय जिजाऊ

वर्षाताई घोगरे



अमरावती



मा. वेरुळकर सर, आपण करत असलेले हे समाजकार्य खूप मोलाचे आहे . मला माझ्या मुली साठी योग्य वर आपण सुचवले आणि दोघांचा शुभ विवाह समारंभ पार पडला. असेच आमची आणि समाजाची मदत करत राहा. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

री.बाबुराव गुलाबराव जवरे, शिक्षक साै.देवका बाबुराव जवरे चि.अभिषेक बाबुराव जवरे



शिक्षक काॅलनी वार्ड नं.१६ माेताळा जि.बुलढाणा



|| श्री.संत मुक्ताबाई प्रसन्न || श्री.आदणीय वेरुळकर सर व सर्व कुटुंब आनंद हाेताे की, आपण*दि.१९/७/२०२० रविवार ला सकाळी १२ ते ५ या कालावधी मध्ये विनामूल्य अाॅनलाइन सकल मराठा उपवर-वधू तृतीय परीचय मेळावा आयाेजित केला व ताे यशस्वी रीत्या संपन्न झाला. आपले जे कार्य आहे ते समाजासाठी अवर्णनीय व अतुलनीय आहे. हे कार्य करण्यास परमेश्वर व श्री संत मुक्ताबाई आपणास उदंड आयुष्य देवाे. ही ईश्वर चरणी मी व माझे कुटुंब प्रार्थना करताे.नमस्कार जय जिजाऊ , जय महाराष्ट्र !

Mohan Dinanath Patil , ( yerlikar ) .....



Retd. Jail Supdt . (Principal , Jail Officers Training College , Yerawada , Pune. ) (Law & Reaserch Officer , Maharashtra Prison Head Quarter ,) Pune.



षडानन नमस्कार , खरोखरच हाती घेतलेला वसा, कामाचे स्वरूप, कामाचा ताण व व्याप हा वाढतच जाणार आहे , त्यात आरोग्या कडे दुर्लक्ष होण्याची शक्यता वाढते आहे अाणि तसे करून चालणार नाही , हे तुला ही माहीत आहे, पण ध्येपूर्तीसाठी वेडयाने झपाटलेले व्यक्तिमत्व त्याकडे दुर्लक्ष च करत असल्याचे दाखले ही आहेतच..... त्यासाठी वेबसाईटचा उपयोग खरोखरच चांगला होईल ..... श्री.पाळेकर साहेबांची सूचना व श्री.चोपडे साहेबांची कळकळ याला माझा १००% पाठींबा आहे , व तुझ्या पेक्षा ज्येष्ठ म्हणुन व आग्रह म्हणुन मला सुद्धा तशी विनंती करावीशी वाटते.....

डॉ. सुरेश बाठे, प्राचार्य



बुलडाणा .



वेरुळकर सर , नमस्कार ! कोवीड १९ च्या या महामारीच्या संकटात सुद्धा आपण आपले कार्य न थांबवता online सुरू ठेवले. मी स्वतः दोन वेळा सहभागी होऊन प्रत्यक्ष अनुभवले. हाती घेतलेले कार्य निश्चितच अवघड आहे, शिवाय विनामुल्य ! Online मध्ये काम करताना काय अडचणी येतात हे मी माझ्या क्षेत्रात काम करताना अनुभवले, त्यात आपण सेवानिवृत्त आहात. अशा वेळी एक वसा म्हणून आपण समाजासाठी विनामुल्य हे कार्य करीत आहात, निश्चितच आपल्यावर ताण येणारच ! पण तब्येत कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आधी तब्येत सांभाळा ! कामाचा व्याप हलका करण्यासाठी वेबसाईट चा वापर उत्तम पर्याय ठरू शकतो. आपण ध्येय वेडे आहात, कामात खंड पडू देणार नाही हा आपला स्वभाव गुण आम्हाला चांगला माहीत आहे. करीता लवकरात लवकर वेबसाइट तयार करून लवकरच वेबसाइट सुरू करा. तेव्हा ईश्वर आपल्याला या कामी उत्तम आरोग्य प्रदान करो, ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो व आपल्या पवित्र व पुण्याच्या कार्यास शुभेच्छा देतो.

श्री.सुरेश रोंघे.



नागपूर ,महाराष्ट्र



आदरणीय श्री वेरुळकर सर, सा.न.वि.वि. राजमाता जिजाऊ सकल मराठा साेयरीक महाराष्ट्र या ग्रुप च्या माध्यमातून आपण जी सेवा देत आहे ती फार अभिनंदनीय आहे. तसेच ती विनामूल्य आहे हे त्याही पेक्षा अधिक अभिनंदनीय आहे. हे काम करताना तब्येत जपणे सुध्दा अत्यंत गरजेचे आहे. तरी आता ग्रुप वर जास्त सभासद झाल्यामळे आपण website काढावी व त्यासाठी आवश्यक शुल्क सर्व ग्रुप मेंबर कडून घ्यावे असे मला वाटते. *Health is wealth*. आपणास पुढील सर्व कामासाठी शुभेच्छा.तब्येतीची काळजी घ्यावी. हि विनंती. आपला स्नेही :

भाऊराव पाळेकर



अकोला



आदरणीय वेरुळकर सर सप्रेम नमस्कार लॉक डाऊन च्या काळात राजमाता जिजाऊ सकल मराठा सोयरिक पुसद जिल्हा यवतमाळ, या व्हॉटस् अप ग्रुप द्वारा तीन मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. त्यापैकी पहिला मेळावा दिनांक ३१ मे २०२० दुसरा मेळावा दिनांक १४ जून २०२० आणि तिसरा मेळावा नुकताच १९ जुलै २०२० ला आयोजित केला गेला होता. तीन ही मेळाव्या करिता १०० पेक्षा जास्त उपवर वधू मुलामुलींनी सहभाग घेतला होता त्यांचे पालक वर्ग सुद्धा आवर्जून उपस्थित होते. दिनांक १९ जुलै २०२० रोजी आयोजित केलेलाऑनलाईन तिसरा मेळावा हा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला आहे आपले प्रकृती स्वास्थ्य ठीक नसून सुद्धा सकाळी ११.४५ पासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अखंड एकाच ठिकाणी बसून अगदी खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रमाचे उत्तमरित्या सादरीकरण केले. कुठेही कंटाळवाणे पणा दिसून आलेला नाही ही बाब खरोखरच सर आपल्या करिता अभिमानास्पद आहे. तसेच आपल्या बोलण्यातील गोडवा हा कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत एकसारखा कायम होता त्यामध्ये कुठेही कटुता आढळून आलेली नव्हती अगदी धीरगंभीर, सावकाश, निवांत आणि शांतपणे कार्यक्रमाची लय - बद्धता सुरू होती. त्यामध्ये आवाजाचा कुठेही चढ-उतार पणा दिसून आलेला नाही. कार्यक्रमातील प्रत्येक उपस्थित उपवर-वधू मुला-मुलींच्या परिचय पत्रातील काही काही बाबी आपण स्वतः त्यांना विचारून त्यांना बोलते करून पूर्ण करून घेत होते यावरून कार्यक्रम हा उत्कृष्ट व्हावा, आणि उपस्थित पालक वर्गाला प्रत्येक उमेदवाराची परिपूर्ण माहिती मिळावी, तसेच क्रमांकानुसार प्रत्येक उपवर-वधू उमेदवार परिचयासाठी उपस्थित न झाल्यास ते उपस्थित व्हावे म्हणून वारंवार त्यांच्या नावाची घोषणा करित होते. यावरून उमेद्वारा विषयी आपल्याला असलेली आपुलकी,प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता, जीवाची तगमग, तळमळ अतिशय तीव्र स्वरूपात असल्याचे जाणवत होते. म्हणतात ना ! सर ,"ज्यांचा स्वतःवर व स्वतःच्याअभ्यासावर प्रचंड विश्वास असतो ते जीवनात कधीच हार मानत नाही" १६७ विवाह जुळवणी चे ध्येयपूर्ती करता आपल्याला अनेक अडचणींशी सामना करावा लागला, अनेक कठीण प्रसंग उद्भवले, पण यामध्ये कधीही आपण माघार घेतली नाही सतत पुढे पुढे आणि पुढेच जात राहिलेत. त्या मुळेच तर आपली राजमाता जिजाऊ सकल मराठा सोयरीक पुसद जिल्हा यवतमाळ ही संस्था राज्यात व देशातच नव्हे तर विदेशात सुद्धा नावारूपास आली आहे. त्याबद्दल आपले व आपल्या कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा. तसेच कार्यक्रमाची तांत्रिक बाजू ज्यांनी उत्कृष्टरित्या सांभाळली ते म्हणजे आपले सुपुत्र श्री.वैभव कुमार वेरुळकर यांचे सुद्धा खुप खुप अभिनंदन. ईश्वर आपणास व आपल्या कुटुंबियास सुदृढ आरोग्य प्रदान करो व आपली संस्था ही नवनवीन योजनेसह प्रगतीपथावर जात राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अकोला

भाऊराव पाळेकर





आदरणीय वेरुळकर सर, सप्रेम नमस्कार "राजमाता जिजाऊ मराठा सोयरिक व्हाट्सअप ग्रुप" च्या माध्यमातून आपण १ जानेवारी २०१७ पासून ते जुलै २०२० पर्यंतच्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत एक,दोन नव्हे तर ए बी सी डी वाईज असे दहा सभासदांचे ग्रुप तयार केले आहेत. आणि एका ग्रुपमध्ये जवळ जवळ दोनशे ते अडीचशे सभासदांचा समावेश करण्यात आला आहे. आणि हे कार्य पुढेही असेच वाढत राहणार आहे. सभासदांची संख्या वाढून ग्रुप ची संख्या सुद्धा वाढती राहणार आहे. या करिता सरांना माझी अशी विनंती आहे की, त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुप चे वेबसाईट मध्ये परिवर्तन करून नवीन कार्यपद्धती अमलात आणावी. ज्यामुळे सर्व कार्य स्वयंचलित (ऑटोमॅटिक) पद्धतीने होईल. आणि आपल्या प्रकृती स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा योग्य राहील.तसेच आपल्याला असलेल्या सामाजिक कार्याची आवड लक्षात घेता कार्याचे व्यवस्थापन हे अतिशय उत्तम, सुरेख आणि चांगल्या पद्धतीने केल्या जाईल. यात मुळीच शंका नाही. यासाठी आपण कुठल्याही मानसिक तणावा मध्ये न येता, आपल्या प्रकृती स्वास्थ्याची योग्य ती काळजी घ्यावी.आणि या नवीन कार्यासाठी नाम मात्र शुल्क घेऊन कार्याची अमलबजावणी सुरू करण्यात यावी.असे मला वाटते. आपल्या राजमाता जिजाऊ मराठा सोयरिक या व्हॉटसअॅप ग्रुप मध्ये सर्व उच्च विद्याविभूषित उपवर-वधू मुल-मुली व पालक वर्ग मोठ्या संख्येने नोंदणीकृत आहेत. त्यामुळे सर्व पालक वर्ग तथा समाजबांधव नाम मात्र शुल्क देण्यास सहज तयार होतील. अाणि या बाबत कुणाची हरकत नसेल असे मला वाटते.आणि हे आपल्या सर्व समाज बांधवांना सहज शक्य आहे. या वेबसाईट मुळे आपल्या सर्व समाजबांधवांना उपवर-वधू मुला-मुलीं चे लग्न जुळविण्या करिता एक चांगली संधी उपलब्ध होईल.आणि याचा सर्वात महत्वाचा फायदा असा होईल की, एकदा या वेबसाईट वर उपवर-वधू मुला-मुलींचे नाव नोंदविल्यानंतर आपल्या आवडी नुसार स्थळांची माहिती त्वरित मिळू शकते. जसे की,स्थळ हे कुठल्या जिल्हयातील हवे, कुठल्या वया पर्यंतचे वर-वधू हवेत,उंची किती असावी, शैक्षणिक अहर्ता कुठली असावी. इत्यादी माहिती घरबसल्या त्वरित उपलब्ध होऊ शकते. करिता माझी सर्व समाजबांधवांना विनंती आहे की ,आतापर्यंत आपण सरांना त्यांच्या नवनवीन योजने मध्ये जे सहकार्य केले आहे आणि करीत आहात. असेच सहकार्य सरांच्या या नवीन वेबसाईट च्या उपक्रमासाठी सुद्धा करावे. जेणे करून आपल्या उपवर वधू मुला मुलींच्या लग्न जुळवणी संदर्भात आपल्या सर्व समाज बांधवांना खूप फायदेशीर ठरेल. ईश्र्वर आपणास शक्ती देवो आणि आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुस्थितीत ठेवो ही प्रभु चरणी प्रार्थना.धन्यवाद

हेमंत चोपडे



रा.कोळंबा ता.नांदुरा जि.बुलढाणा ह.मु.नाशिक



्री.षडानन वेरूळकर सर नमस्कार! अद्ययावत ,जगाच्या सोबत राहून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर मराठा समाजासाठी 'विवाह सोयरिक" च्या माध्यमातून अविरतपणे ,गेल्या तीन चार वर्षापासून आपण करीत आहात. नोकरी सांभाळून आतापर्यंत हे कार्य केले. आता आपण सेवानिवृत्त आहात. पुन्हा झपाटल्यागत कामाला लागला आहात. एवढे गृप, दोन हजारच्या वर बायोडाटा, त्यासंबंधी चा संपर्क, हे व्यक्तीशः तुम्हाला शारीरिकदृष्ट्या त्रासदायकच आहे. हे काम तर महत्त्वाचे आहेच ; पण स्वतःला कमीत कमी त्रास होईल असे करावे. घेतलेला समाजवसा तुम्ही थांबवणार नाहीच ! याची खात्री आहे. सहाय्यक नेमा. अर्थात ती व्यक्ती पण समाजसेवी वृत्तीची हवी. ते मिळणे कठिणच आहे. समाजाच्या प्रेमापोटीच आपले हे कार्य आहे. श्री.भाऊराव पाळेकर साहेबांनी सुचवलेली कल्पना छान आहे. समाजाच्या हिताचे असे हे कार्य आहे, हे अविरत सुरूच राहिले पाहिजे. शेवटी दोन घराणी गुंफण्याचं , संसार मार्गी लावण्याची कामे होत आहेत. विवाह ईच्छुकही यामधे खारीचा वाटा उचलतील. याचाही ,स्वतःची ईच्छा नसतांनाही आपण विचार करावा ! आपल्या कार्यास खुप खुप शुभेच्छा!

Page 8 of 15