मनोगत

सौ.मीरा लांजूडकर व रमेश लांजूडकर इंगाेले नगर, हडकेश्वर राेड, नागपूर





श्री.वेरुळकर सर, सकल मराठा समाजातील उपवर-वधूंच्या लग्नगाठी जुळवण्यासाठी तुम्ही लाॅकडाऊनच्या काळात सुध्दा अमुल्य वेळ देवून सोशल मिडीयाव्दारे उपक्रम राबवून तुम्ही जोमाने, जिद्दीने, शांतपणे आणि कुठलाही मोबदला न घेता हे काम करीत आहात ह्या कामा करिताच ईश्वराने तुमची देवदूत म्हणून पृथ्वीवर निवड केली आहे. असे काम या काळात कोणीही एवढ्या खात्रीशीर पणे करणे अशक्य आहे जणूकाही तुम्ही त्याचे व्रतच घेतले आहे. श्री.षडानन वेरूळकर सर, व साै. मुक्ताताई वेरुळकर अापण दाेघांना आमचे दाेघांचे शत शत प्रणाम !

वामनराव संपतराव घोगरे



मंगलदिप नगर 1, नागपूर



राजमाता जिजाऊ मराठा साेयरीक महाराष्ट्र या ग्रुपच्या सर्व सभासदांना माझा नमस्कार. सकल मराठा समाजातील उपवर- वधूंच्या लग्नगाठी जुळण्यासाठी लॉकडाउन कालावधीत देखील, सोशल मीडिया द्वारे उपक्रम राबवून श्री.वेरुळकर सर ज्या जोमाने, जिद्दीने, गतीशीलतेने , सहनशीलतेने व अविश्रांत हे काम करीत आहेत. ते अमूल्य असून त्यास तोड नाही , श्री.वेरूळकर सरांनी त्या वरून समाज सेवेचे व्रत स्विकारलेले दिसते ! त्यानुसार आपण सभासदांनी देखील सकारात्मक वर्तणुकीची त्यांना जोड दिली पाहिजे. नव्हे किंबहुना ती आपली नैतिक जबाबदारीच आहे असे मला वाटते. माझ्या माहिती नुसार २०० संख्येचा एक ग्रुप या प्रमाणे १० ग्रुप ची संख्या २००० होते. त्यानुसार २००० मुला- मुलींची परीचय पत्रे श्री.वेरूळकर सरांना सादर होणे क्रमप्राप्त असतांना केवळ ८०० इतकीच परीचय पत्रे त्यांना प्रत्यक्षात सादर झाली आहेत ? अन्य १२०० सभासदांनी अद्याप देखील त्यांच्या पाल्यांची परीचय पत्रे सादर केल्याचे दिसत नाहीत. हे निश्चितच योग्य नाही. उर्वरित सभासदांनी परीपूर्ण परीचय पत्रे सादर केल्यास खऱ्या अर्थाने निश्चितच उद्देश साध्य होईल. करीता राजमाता जिजाऊ मराठा साेयरीक महाराष्ट्र या ग्रुप च्या संबंधित सर्व सभासदांना मी आवाहन करतो की, या बाबतीत त्यांनी कृतीशीलतेने विचार करून कार्यवाही करावी ही विनंती. धन्यवाद ! वामनराव संपतराव घोगरे मंगलदिप नगर 1, नागपूर

भाऊराव पाळेकर



अकोला



आदरणीय वेरुळकर सर, सप्रेम नमस्कार राजमाता जिजाऊ मराठा सोयरीक महाराष्ट्र या ग्रुपमधील सर्व सभासदांना माझा नमस्कार. मी ग्रुप मधील सर्व उपवर वधू मुला-मुलींना व त्यांच्या पालकांना याद्वारे विनंती करतो की, राजमाता जिजाऊ मराठा सोयरीक पुसद जिल्हा यवतमाळ हा ग्रुप दिनांक १.१.२०१७ पासून कार्यान्वित असून तेव्हापासून आतापर्यंत आदरणीय वेरुळकर सरांनी या संस्थेची धुरा अतिशय उत्तमरित्या सांभाळली आहे. आणि आपल्या सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने १५५ उपवर-वधू मुला-मुलींचे विवाह जुळवले आहेत. ही बाब वेरुळकर सरांसाठी खूप अभिमानास्पद आहे. याबद्दल वेरुळकर सरांचे खूप खूप अभिनंदन. हे कार्य करीत असताना, सरांनी एकाच ठिकाणी न थांबता विविध नवनवीन उपक्रमाद्वारे वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करून राजमाता मराठा सोयरीक पुसद जिल्हा यवतमाळ या संस्थेला उच्च शिखरावर पोहोचवले असून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख निर्माण झाली आहे. यासाठी आपल्या सर्व समाजबांधवांन कडून व सभासदांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आदरणीय वेरुळकर सर यांनी दिनांक २६.५.२०२० रोजी विनामूल्य ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मेळाव्याची घोषणा केली आणि लगेच दिनांक ३१.५.२०२० व दिनांक १४.६.२०२० असे दोन दिवस उपवर-वधू परिचय मेळाव्याचे विनामूल्य ऑनलाइन कॉन्फरन्सिंग वर अतिशय शिस्तबद्ध रीतीने मेळाव्याचे आयोजन केले. यासाठी या दोन्ही मेळाव्यामध्ये जवळजवळ १०० ते १५० उपवर-वधू मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. आणि सदर कार्यक्रमास आपल्या सर्वांच्या सहकार्याने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून अतिशय शिस्तबद्ध स्थितीत कार्यक्रम पार पडला याची आपणा सर्वांना माहिती आहेच. नुकतेच सरांनी आता " व्हिडीओ परिचय पत्र " ही नवीन योजना कार्यान्वित केली आहे. ज्याद्वारे प्रत्यक्षात उपवर-वधू, मुलं-मुली बोलून तयार केलेले व्हिडियो परिचय पत्र यु ट्यूब लिंक च्या माध्यमातून आपण सर्वांना दिसणार आहे. त्यासाठी माझी ग्रुपमधील सर्व उपवर-वधू मुला-मुलींना व त्यांच्या पालकांना विनंती आहे की, आदरणीय वेरुळकर सरांच्या या नवीन योजनेसाठी फोटो नसलेले स्वतंत्र परिचय पत्र व परिचय पत्रानुसार परिचय व्हिडीओ तयार करून सदर व्हिडिओ परिचय पत्र सरांच्या ९४२१७७४५२३ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवून त्यांच्या या नवीन उपक्रमास जास्तीत जास्त सहकार्य करू या ! आणि राजमाता जिजाऊ मराठा सोयरीक , पुसद जिल्हा यवतमाळ. महाराष्ट्र या संस्थेचे नांव उज्ज्वल करू या!. धन्यवाद.

Mr. Bandubhau Tathe Mrs.Shaila Tathe.



Shashtri chowk Alandi road, Bhosari, Pune 411039



Dear Respected Sir... Namaskar!!! Yesterday was online bride and groom melava which was organised by you... The way it was managed was mind blowing.. Tremendous.. I was really impressed.. What a great work selfless you are doing.. Salute to you and your family.. Pls keep it up.

मुरलीधर दामोदर गोळे



सी 403, फ्लोरेंशिया सी.एच.एस. कस्पटे वस्ती, वाकड, पुणे.



वेरुळकर सर नमस्कार ! दि. १४/६/२०२० रविवार ला आपल्या मार्गदर्शना खाली संपन्न झालेला मेळावा मी सकाळी 11.45 पासुन सायं. 5 पर्यंत बघितला. त्यात माझी मुलगी कु.ऊमा गोळे हिने परिचय दिला व मी दर्शक म्हणुन शेजारी बसुन होतो. या मेळाव्यात आपण न थकता नॉन स्टॉप केलेले मार्गदर्शन खरोखर वाखाणण्या जोगे होते. आपले त्या बद्दल खुप खुप अभिनंदन.

प्रा. महादेवराव शंकरराव कोठेकर साै.शैलजा महादेवराव काेठेकर



प्राध्यापक काॅलनी, दर्डा नगर, यवतमाळ



आदरणीय वेरुळकर साहेब, सप्रेम नमस्कार दि.14 जून रोजी आपल्या ग्रुप व्दारे आयोजीत केलेल्या ऑनलाईन व्हिडीओ वधुवर परिचय मेळाव्याच्या अपूर्व यशा बद्दल आपले हार्दिक अभिनंदन. कार्यक्रम यशस्वी व्हावा ह्या हेतूने आपली होणारी धडपड,कार्य तत्परता,चिकाटी,तसेच आपली कर्तव्य परायनता पाहून थक्क झालो.मी सकाळी 11.00 वाजता पासून शेवट पर्यंत कार्यक्रमाचा माझ्या कुटुंबासह आनंद घेत होतो. सेवा निवृत्ती नंतर सामान्य व्यक्ती स्वतः पुरता मर्यादित होतो.परंतु आपण आपल्या सामाजिक ग्रुप चे माध्यमातून जे सामाजिक कार्य याही वयात करीत आहात ते अतिशय वाखाण्यानिय आहे. कार्यक्रमा दरम्यान आपण आपली बैठक ऐकदाही न सोडता जी कर्तव्य दक्षता दर्शविली त्यास तोड नाही. कार्यक्रमा दरम्यान आपण आधुनिक तंत्रज्ञान वापरून अतिशय दुरदर्शीतेचे प्रमाण दिलेले आहे की जेणेकरून जगाच्या कानाकोपऱ्यात वास्तव्यास असलेल्या समाज बांधवास ह्याचा लाभ होईल. कोरोना सारख्या महामारीच्या प्रतिकूल परिस्थितीत ही न डगमगता आपण समाजा करीता जे अथक परिश्रम करीत आहात त्या आपल्या वृत्तीस माझा सलाम. आपल्या उपरोक्त उपक्रमामुळे अनेकांपुढे ऐक वेगळा आदर्श उभा राहील. तसेच आपल्या सामाजिक कार्यापासून अनेकांना पुढील काळात प्रेरणा मिळेल ही सर्वसाधारण अपेक्षा. आपल्या उपरोक्त सकारात्मक कार्यामुळे आपण मला " प्रचंड वादळात खंबीरपणे उभ्या असलेल्या स्थिर दिपस्तंभा सारखे भासता ". आपल्या सदर सामाजिक कार्यास माझा मानाचा मुजरा.

रमेश पाटील



सदाशिव पेठ, पुणे



श्री.वेरुळकर सर नमस्कार ! सर, आपल्याला डाेळ्याचा व मानेचा एक वर्षा पासून त्रास होतो आहे. तरी सुद्धा आपले समाज सेवेचे कार्य अखंड सुरुच आहे. शिवाय सध्या त्रास वाढला आहे. त्या मुळे आपली प्रकृती ठिक राहत नाही. तरी पण आपली ईच्छा आहेच समाज सेवा करायची. काही हरकत नाही परंतु त्या करीता आपण स्वतः कष्ट न करता आपण हे काम वेबसाइट व्दारे करु शकता. सध्या आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुप चे आपण आता पर्यंत दहा ग्रुप तयार केलेले आहे आणि या पुढे ही चालूच राहणार आहे. आणि ग्रुप ची संख्या ही वाढतच राहणार आहे. या करिता माझे मत असे आहे की, आपण व्हाट्सअप ग्रुप चे वेबसाईट मध्ये रुपांतर करावे. व इतर वेबसाइटच्या वार्षिक नाेंदणी शुल्क पेक्षा आपल्या वेबसाइट ची वार्षिक नाेंदणीशुल्क कमी आकारुण हे समाज कार्य सुरुच ठेवावे. त्यामुळे सर्व कार्य स्वयंचलीत (Automatic) होईल. आणि आपल्याला जास्त त्रास सुध्दा होणार नाही. आणि आपल्या अत्यंत आवडीच्या समाज सेवेचे कार्य अतिशय सुयोग्य पद्धती ने होईल या मध्ये कुठलीच शंका नाही. आणि विशेष म्हणजे सर्व समाजबांधव तथा सभासदांचा एकच मोठा ग्रुप तयार करता येईल व आपल्या प्रकृतीला पोषक अशा वातावरणाची निर्मिती होऊन कार्याचे व्यवस्थापन सुध्दा आपण अतिशय उत्तम, सुरेख आणि चांगल्या पद्धतीने कराल. आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सर्व उच्च विद्याविभूषित उपवर-वधु व पालक आहेत त्या मुळे शुल्क देणे सर्वांनाच शक्य आहे. त्यामुळे आपल्या सर्व समाज बांधवांना वेबसाइट चा लग्न जुळण्या करीता चांगला उपयोग होईल.

साै.नंदिनी जवादे



वर्धा



श्री.वेरुळकर सर आपले कार्य खूप बहुमोलचे आहे आणि आपण कार्यासोबत खूप मेहनत घेता त्यामुळं सर्व प्रथम आरोग्य जपणे जरुरी आहे त्या मुळे काळजी घ्या ! लवकरात लवकर बरें व्हा ! सर , तसेच आपण व्यापक स्वरूपात या कार्याला वेबसाईट द्वारे नाममात्र शुल्क आकरून केले तर जास्तीत जास्त लोक या संधीचा लाभ घेऊ शकतील. प्रकृती ची काळजी घेऊन लवकरात लवकर बरे व्हा ! धन्यवाद ! साै.नंदिनी जवादे कारंजा चाैक, हिंगणघाट जि.वर्धा

श्री.कुणाल अरविंद देशमुख



स्थापत्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग,पुसद जि.यवतमाळ.



आदरणीय वेरुळकर सर, नमस्कार ! आपण मला आपले ग्रुप मध्ये समाविष्ट करून घेतले त्या बद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानतो राजमाता जिजाऊ मराठा सोयरिक या ग्रुप चे माध्यमातून असंख्य मराठा, देशमुख, पाटील, कुणबी, तिरळे कुणबी व इतर तत्सम सकल मराठा परिवारांना एकत्र आणण्याची जी मोहीम आपण हातात घेतलेली आहे ती खरोखरच अतुल्य व कौतुकास्पद आहे. या धावपळीच्या जीवनात आपण वेळातली वेळ काढून निःशुल्क, ही समाजसेवा करत आहात त्याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या ग्रुप मधील वातावरण हे शिस्तबद्ध असून अतिशय नियोजन बद्ध आहे. राजमाता जिजाऊ मराठा सोयरिक या ग्रुप सारखे, नियोजन तसेच ओळख पटवून सभासदांना समाविष्ट करून घेणे तसेच सभासदांना सुरक्षे बद्दल विश्वास पटवून देणे या सर्व बाबी इतर ग्रुप मध्ये बघायला मिळत नाही. आपण जी समाजसेवा करत आहात त्यातील नित्यनूतन आव्हानांना सामोरा जात अभिनव क्षितीजे पादाक्रांत करीत राष्ट्रहितार्थ उत्तुंग कृती आपल्या हातून घडावी ! हिच तीव्र तळमळ मनाशी ठेवून आपणासाठी जिजाऊ चरणी *प्रार्थना!* श्री.कुणाल अरविंद देशमुख स्थापत्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग,पुसद जि.यवतमाळ.

साहेबराव पाटील करडभाजणे





जय शिवराय आदरणीय वेरुळकर सर, नमस्कार. आपण करत असलेल्या कार्याला सलाम .... या वयात सर्व कुटुंब सांभाळून, तसेच, वयाची पर्वा न करता, आपण समाजासाठी जी धावपळ करत आहे ते उल्लेखनीय आहे. मी माझ्या वयात आजपर्यंत असा कोणीही बघितला नाही जो, समाजासाठी इतकी धावपळ करत असेल. आणि तीही निःशुल्क.... आपण खरेच याबाबतीत एक युगपुरुष आहात. आपण , फोटो, व्हिडिओ, वेबसाईट, चे माध्यमातून जी समाजसेवा करत आहे त्याबद्दल खरेच आपणाला *समाज भूषण पुरस्कार* द्यायलाच पाहिजे, व आम्ही निश्चितच प्रयत्न करू. बाकी *देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो. कारण तुमच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात आज आम्ही अनेक लोकांशी biodata मुळे जुळले गेलो. आणि आपणामुळेच अनेक लोक संपर्कात आली. देव तुम्हाला अजून शक्ती देवो. जय शिवराय, जय कुणबी, जय तुकोबा, जय जिजाऊ. आपला साहेबराव पाटील करडभाजणे प्रवक्ता महाराष्ट्र राज्य कुणबी कृती समिती. सचिव,ऑल इंडिया रोजंदारी कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य.*

Page 7 of 15