मनोगत

श्री.माधव पं.भानारकर



सी-4, रामबाग काॅप्लेक्स 12, रामकृष्ण नगर. ताजश्री होंडा शोरूम समोर, खामला रोड, नागपुर-15



श्री.षडानन वेरूळकर सर, नमस्कार, मी गुगल वरती साेयरीक संबंधित वेबसाइट सर्च करतांना मला " वेरुळकर सकल मराठा साेयरीक, महाराष्ट्र " ही वेबसाइट दिसली मी संपूर्ण वेबसाईट बघितली."वेरुळकर सकल मराठा साेयरीक",महाराष्ट्र ही वेबसाईट महाराष्ट्रातील सकल मराठा समाजातील उच्चविद्याविभूषित वर-वधू, मुुला-मुलींचे भरपूर स्थळ उपलब्ध असलेली व सर्वांना परवडणारी महाराष्ट्रातील सर्वात कमीत कमी नाेंदणी शुल्क असलेली एकमेव वेबसाईट आहे. या वेबसाइट ची रचना एकदम उत्कृष्ट व अप्रतिम् अशी आहे. सर, आपण सकल मराठा समाजासाठी या वेबसाइटच्या माध्यमातून उत्कृष्ट समाजकार्य करीत आहात. त्या बद्दल आपले खूप खूप अभिनंदन व पुढील समाजकार्यासाठी हार्दिक शुभेच्छा ! या वेबसाइट चा सकल मराठा समाजातील लोकांनी जास्तिजास्त फायदा घ्यावा. ही सकल मराठा समाजाला माझी विनंती आहे. धन्यवाद !

श्री.प्रभाकर पाचपोर,



सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता विद्युत वितरण कंपनी, पुणे



सर्वप्रथम वेरुळकर सकल मराठा वधुवर सूचक केंद्र,पुसद ह्यांना माझ्या हार्दिक हार्दिक मन:पूर्वक शुभेच्छा ! मी आदरणीय श्री.षडानन वेरुळकर दादांच्या निस्वार्थ सेवाभावी वृत्तीस दाद देतो. मी माझ्या आयुष्यात असे समाजकार्य अनुभवले नाही. तसेच आजघडीला इंटरनेट च्या युगात जितक्या काही सामाजिक वैवाहिक वेबसाईट्स असतील त्या सर्वांमध्ये वेरुळकर सकल मराठा साेयरीक ही वेबसाईट तांत्रिक दृष्ट्या दोषविरहित आणि सुलभ वेबसाईट आहे असे माझे मत आहे. वेरुळकर दादांनी आणि त्यांच्या तीन अभियंता मुलांनी अथक प्रयासानी सकल मराठा समाजाच्या लोकांना अशी सोपी आणि सुलभ सेवा उपलब्ध करून दिली ह्याबाबत त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो व भविष्यात सुद्धा त्यांच्या वाटचालीस विनासायास यश कीर्ती लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो ! || जय गजानन माऊली ||

नीता किशोर पुंड





नमस्कार ! "वेरुळकर सकल मराठा वधु वर सूचक केंद्र" यामध्ये माझ्या मुलाचे नाव नोंदविले होते व खुप चांगली स्थळे या केन्द्राने मला सूचविली व त्यामुळे त्यांनी सूचविलेल्या मुलीमधूनच आम्हाला एक मुलगी पसंत पडली व माझ्या मुलाचे लग्न जुळले. कमी वेळात ख़ूप चांगल्या प्रकारचे स्थळ आम्हाला सूचविण्यात आले. आम्हाला तुमच्या वेरुळकर सकल मराठा सोयरीक या वेबसाइट चा चांगला फायदा झाला. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. भविष्यात तुमचे कार्य असेच सुरु राहोत ही सादिच्छा. नीता किशोर पुंड

डाॅ.दिलीप शालिग्रामजी साखरे



रा.माहुली(धांडे) ता.दर्यापूर जि.अमरावती



आदरणीय वेरुळकर सर नमस्कार ! माझा मुलगा चि.अक्षय याचा विवाह श्री.गजाननराव वसंतराव चतरकर रा.कापशी ता.जि.अकाेला यांची मुलगी कु.नंदिनी हिचे साेबत जुळला आहे दि. ११ /०७/ २०२१ रविवार राेजी अकोला येथे दाेघांचा साक्षगंध चा कार्यक्रम संपन्न झाला. हे सर्व आपले " वेरुळकर सकल मराठा साेयरीक " या वेबसाईट चे माध्यमातून घडून आले, आपण करीत असलेले हे समाजकार्य खुपच उच्च दर्जाचे असुन समाजाकरिता खुपच आवश्यक आहे. सध्याचे परीस्थितीत समाजातील मुले, मुली संपूर्ण भारतात व विदेशात सुध्दा नाैकरी निमित्ताने विखुरलेले आहेत त्यांच्या पर्यंत पाेहचण्या करीता आपल्या वेबसाइट ची खूपच मदत होते. समाजातील दोन भिन्न कुटुंब एकत्रित आणणे या समाजकार्यासाठी आपले शतशः आभार व हे काम अखंडितपणे सुरू रहावे. याकरीता सुयश चिंतीताे. धन्यवाद सर !

Prof. S. L. Patil



Nashik, Friday - 23rd July 2021



We Salute you Verulkar Sir !!! For Your Devotion, Dedication and Determination for this Noble Activity.You have been doing an Outstanding work for the Youngsters who are in search of an Ideal Life Partner in their Life. This work is not so easy but you made it Easiest and Happiest. Sir, God has given you Devine qualities and Humble Nature. You have maintained Unique Human Relationship with Thousands of Families of India. Sir, on the Auspicious Occasion of Guru Purina, We wish you Long... Healthy... Wealthy and Happiest Life. Jio Jio Jio To Aise Jio... Shan Se Jio Ayu Ke Ant Tak Prem Barasate Raho... Hansate Raho, Gate Raho Jindagike Har Pailonka Anand Lete Raho... All the Best Sir ! Well-done !! Prof. S.L.Patil, Nashik Mo.No.9604120749

गजाननराव वसंतराव चतरकर



रा.कापशी ता.जि.अकाेला



अादरणीय वेरुळकर सर नमस्कार ! आजच्या परीस्थितीत विवाह जुळवणी हे काम अतिशय जिकरीचे झाले असुन पूर्वीसारखी मध्यस्थ ही भूमिका जवळजवळ शिल्लक राहिली नाही, मात्र आपण अशा परिस्थितीत प्रथम व्हाॅटसअप ग्रुप, टेलीग्राम ग्रुप, नंतर बेबसाईट यांच्या माध्यमातून समाजाकरीता एक चांगले, सुटसुटीत, विश्वासार्ह दालन उपलब्ध करून दिले याचा फायदा समाजाला मिळत असुन अनेकांचे विवाहयोग जुळुन येत आहेत. माझ्या मुलीचा सुध्दा विवाहयोग आपल्या वेबसाईट च्या माध्यमातून जुळुन आला अाहे. त्या बद्दल मी अापले आभार मानतो, अाणि आपल्या ह्या समाज उपयोगी कार्यास सुयश चिंतीतो व हे कार्य आपण निरंतर सुरु ठेवाल ही आशा बाळगतो ! धन्यवाद सर !

प्रदिप माराेतराव वसु



नागपूर रविवार १८ जुलै- २०२१



माननीय श्रीयुत वेरुळकर साहेब, सप्रेम नमस्कार, माझ्या मुलीच्या लग्नाबाबत सोयरीक संबधातुन आपल्याशी जुळण्याचा योग आला. यातुन आपल्या स्वभावाचे व कामाच्या विविध स्वरूपाचे खुप जवळुन दर्शन झाले. सुरवातीला आपण लग्नसंबध जुळवण्यातील एक घटक आहात असेच वाटले, पण जसा काळ पुढे सरकत गेला तसतसा आपल्या कार्याच्या व्याप्तीचा अनुभव आला. आज आपल्या अफाट कार्याबद्दल लिहण्याचे कारण म्हणजे आपण समाजबांधवासाठी तयार केलेली वेबसाईट. www.verulkarsakalmarathasoyrik.com ही वेबसाईट बघतांना व हाताळतांना जाणवते व प्रत्यय येतो की आपण या मागे कीती प्रचंड मेहनत घेतली आहे. आमची स्वतःची आय.टी.फर्म आहे. त्यामुळे माझे निदर्शनास आले की, अापण अतिशय छोट्या-छोट्या लग्न जुळण्या बाबतीत च्या बाबी गृहीत धरून ही वेबसाईट आपण तयार केली आहे. आमच्या व्यवसायात आम्ही ह्या गोष्टी रोज हाताळतो, तेव्हा प्रत्यक्ष स्वत:च्या सहभागाशिवाय इतकी सुंदर, सोपी व सुटसुटीत वेबसाईट तयारच होवु शकत नाही. ज्या व्यक्तीला फक्त मराठी वाचता येते तो सुद्धा सर्व प्रकारची माहीती अगदी कमीत कमी वेळात मिळवू शकतो. त्या व्यक्तीला संबंधाबाबत हवी असलेली सर्व माहीती चुटकीसरशी मिळते. आजच्या व्यावसाईक जगात कुठलीच गोष्ट फ्री मिळत नाही. त्यामुळे आपण ही वेबसाईट बनविण्याकरिता नक्कीच लाखो रुपये खर्च केले असतील यात काही शंका नाही आणि हे आपल्या समाजाच्या प्रेमापोटीच केले आहे आणि ताेच व्यक्ती असे अग्निदिव्य पार पाडु शकतो. वेबसाईटचे सुंदर कलर कॉम्बीनेशन एक हाडाचा शिक्षक व त्यानुन चित्रकलेचा शिक्षकच करू शकतो. आपणांस आपल्या घरातीलच सुविज्ञ इंजिनिअर मुलं व सुनबाईला आमचा मानाचा मुजरा. आपल्या हातून असेच समाजकार्य घडत राहो हीच सदिच्छा. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, आपल्यासारख्या व्यक्तिमत्वाची समाजाला अत्यंत आवश्यकता आहे ! आपला शुभचिंतक - प्रदिप माराेतराव वसु व परिवार, धंतोली,नागपूर 7447447461

Smt.Vidya Patil



Amravati



As a parent I was not that tech savvy but this website is easy. I can use it on my own. This is very accurate according to our search. Thank you for this option.

Ku.Samidha Patil



Amravati



I just joined this group and Sir personally gave us their valuable time really explained me the insight of this website and modules of it well. I felt it easy to handle and can search quickly with full details. I can search according to my requirements and filters. That also 10 contacts per week looks good.

मोरखडे परिवार



अमरावती



सकल मराठा समाजातील वर-वधू यांची सोयरीक सहजगतीने जुळण्यासाठी अादरणीय श्री.वेरुळकर सर अापले अथक परिश्रम आणि काळानुसार नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची जिद्द खरच खूप कौतुकास्पद आहे. आदरणीय श्री.वेरुळकर सर आपण काेराेना या जागतिक महामारीत पण न थांबता घरात राहून आणि सर्व शासकीय नियम पाळून अनेक ऑनलाईन मेळाव्यांचे भव्य आयोजन केलेत, फलस्वरूप त्यातून अनेक लग्नही जुळलेत. आपल्या वेबसाईटवर असलेली माहिती त्याची गुप्तता आणि सर्वसामान्य व्यक्तीस वापरण्याजोगे सोपे पर्याय हे ही खूप महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. नुकतेच आमच्या परिवारात देखील आमच्या मुलाचा चि.सुरज शरद मोरखडे याचा शुभविवाह चि.सौ.कां.स्वाती विष्णू देवचे रा.माटरगांव,जि. बुलढाणा यांच्याशी संपन्न झाला असून आपले मार्गदर्शन आम्हास खूप उपयुक्त ठरले. सकल मराठा समाजासाठी करत असलेल्या या सामाजिक कार्याकरिता आपले आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. समस्त मोरखडे परिवार, अमरावती

Page 1 of 15