मनोगत

श्री.दामोदर बळिराम घनतोडे व घनतोडे परिवार



पुणे



मा.वेरुळकर सर नमस्कार ! आपण विवाह ग्रुपच्या माध्यमातून बरेच विवाह जुळवून आणले आजच्या काळात ही समाजाची फार मोठी गरज आहे.आपल्या माध्यमातून माझ्या मुलाचे चि.सागर (MCA) श्री.दामोदर बळीराम घनतोडे केंद्रा बु: जि.हिंगोली, ह.मु.पुणे यांचे चि.सौ.कां.नेहा (M.Tech) श्री.विदुषकराव अजाबराव राऊत पुसद जि.यवतमाळ यांचेशी संबंध जुळुन आलेत व दि.२१/४/२०२१ ला पुसद येथे सर्व सरकारी नियमांचे पालन करून घरगुती पद्धतीनुसार साखरपुडा (साक्षगंध) संपन्न झाला. यामध्ये आपले मोलाचे सहकार्य लाभले. आम्ही आपले खुप आभारी आहोत ! आपल्या हातून समाजाची अशीच सेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! स्नेहांकित - श्री.दामोदर बळिराम घनतोडे व घनतोडे परिवार ,केंद्रा बु:, जि.हिंगोली ह.मु. पुणे

वेरुळकर सकल मराठा वधु-वर सुचक केंद्र®



पुसद



चि.स्वप्नील ME (VLSI and Embedded System) Tech Lead @ Acclivis Technologies, Pune सौ.सुनिता व श्री.रामदास पाटील रा.पिंप्री (अढाव) ह.मु.जळगांव (जामाेद) ता.जळगांव (जामाेद) जि.बुलडाणा यांचे चिरंजीव अाणि चि.सौ.कां.अंकीता BE ( Electrical Engg.) QA @ Persistent System, Pune सौ.सविता व श्री.रमेश मानकर रा.वाडेगांव (सस्ती) मुर्तीजापूर ता.मुर्तीजापूर जि.अकीेला यांची कन्या यांची लग्न साेयरीक जुळली. वेरुळकर परिवार ,पुसद यांचे कडून पाटील व मानकर परिवारांचे मन:पुर्वक हार्दिक अभिनंदन व शुभविवाहा करीता मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा - शुभेच्छुक - श्री.षडानन रूपचंद वेरुळकर (सेवानिवृत्त कलाशिक्षक) संचालक साै.मुक्ताताई षडानन वेरुळकर,संचालिका वेरुळकर सकल मराठा वधु-वर सुचक केंद्र ® पुसद जि.यवतमाळ 9421774523, 7499881909

सुभाषराव सूर्यवंशी



नांदेड



मा.आदरणीय षडानन वेरूळकर सर संचालक, वेरुळकर सकल मराठा वधु-वर सुचक केंद्र, पुसद जि.यवतमाळ (महाराष्ट्र) जय जिजाऊ सर, प्रथम आपले मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन करतो. सर आपण गेल्या अनेक वर्षांपासून मराठा सोयरीक जुळविण्याचे पवित्र व महान कार्य करीत आहात. आता पर्यंत आपण अनेक सोयरीक जुळवील्या. अनेक गृप विनामूल्य चालवले. आपला भरपुर वेळ समाजासाठी खर्च केला. वेळ प्रसंगी आपणास पैसा ही खर्च करावा लागला. तन मन धन व शरिर खर्च करून आपण समाजासाठी कार्यकरित आहात. अापण सात सात तास बसुन विनामुल्य अॉनलाईन ५ मेळावे अाजपावेताे यशस्वी रीत्या पार पाडले. अापण अगदी तुटपुंजी नाममात्र शुल्क घेऊन वेबसाईट सुरु केली आहे. सर आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सर आपली कार्यक्षमता भरपूर आहे. आपले कार्य असेच पुढे चालू राहो. आपणास निरोगी उदंड आयुष्य लाभो हीच इच्छा. आपल्या कार्यास शुभेच्छा ! ••••••••••••••• शुभेच्छुक : सुभाषराव सूर्यवंशी,मुख्याध्यापक, राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी हायस्कूल, हडको नांदेड. तथा सचिव मराठा सेवा संघ,सिडको नांदेड 9421870338

भानुदास दिवाणे



पुणे



वेरुळकर सर नमस्कार ! दि.१७ एप्रिल २०२१ व दि.१८ एप्रिल २०२१ सलग दोन दिवस ऑनलाइन वधू-वर परीचय मेळावा अगदी शिस्तबद्ध आणि उत्साहात संपन्न झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन ! भानुदास दिवाणे, पुणे

भाऊराव पाळेकर अकोला





आदरणीय वेरुळकर सर सप्रेम नमस्कार आपण दिनांक १.१०.२०२० पासून राजमाता जिजाऊ सकल मराठा सोयरीक या व्हाट्सअप ग्रुपचे परिवर्तन करून शेगावीचे श्री संत गजानन महाराज यांचे कृपेने व आदरणीय सभासदांच्या आग्रहास्तव वेरुळकर सकल मराठा सोयरीक या नवीन नावाने वेबसाईट तयार करून एका नवीन सूर्योदयाचा प्रारंभ केला आहे आणि "साकारा आपली नवीन नाती, इथेच मिळवा आपला जीवनसाथी" हे आपले ब्रीद वाक्य यशस्वी ठरले आहे. पाहता पाहता या वेबसाइटला दिनांक ३०.११.२०२० रोजी दोन महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे आणि या दोन महिन्याचे कालावधीतील कार्याचे अवलोकन केले असता दिनांक ३०.११.२०२० रोजी उपवर-वधू मुला-मुलींची एकूण नोंदणी संख्या ही २६० च्या वर गेलेली आहे ही खरोखरच आश्चर्यजनक बाब आहे.यावरून या वेबसाईट चे हे कार्य जलद गतीने प्रगतीपथावर असल्याचे दिसून येते. तसेच या कार्याची विजय पताका अशीच अधिकाधिक उंच भरारी घेण्यासाठी ग्रुपमधील आपल्या सर्व आदरणीय सभासदांकडून तथा समाज बांधवांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे याची जाणीव सुद्धा प्रकर्षाने होत आहे. याकरिता सर्व समाज बांधवांचे तथा ग्रुपमधील सर्व सभासदांचे सहकार्य अतिशय मोलाचे ठरले आहे. हे विसरून चालणार नाही. याबाबत त्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. ही वेबसाईट इतर वेबसाईट प्रमाणे नसून एक वेगळीच असामान्य अशी वेबसाईट आहे की ज्यामध्ये खालील प्रमाणे अतिशय महत्त्वाच्या आणि खास अशा विषेश बाबी आढळून येतात. १) आपली ही नवीन वेबसाईट आधुनिक आणि सर्व बाबींनी परिपूर्ण अशी आहे. २) सुरुवातीला श्री सिद्धि विनायकाचे व शेगावीचे संत श्री गजानन महाराज यांचे दर्शनीय फोटो खूप विलोभनीय स्वरूपाचे आहे ३) सर्वांना समजेल असे वेबसाइटचे स्वरूप आहे सर्वसामान्यांच्या शंकाकुशंका ची खुलासेवार माहिती त्यामध्ये दिली आहे. ४) विशिष्ट आणि मुद्देसूद परिचय पत्राचा मसुदा असल्यामुळे त्यातील माहितीमध्ये एक सारखेपणा दिसून येतो ५) सभासदांचे मनोगत व छायाचित्रांमध्ये सुद्धा एकसूत्रता दिसून येते. ६) फोटोग्राफी सुद्धा खूप सुंदर आहे जणूकाही आपण लग्नाचा अल्बमच बघतो आहे अशी जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. ७) या वेबसाईट मध्ये सर्व ऑप्शन मधून वय, उंची, शिक्षण, नोकरी, उपजात, व्यवसाय,ठिकाण, व मुळगाव इत्यादी पर्यायाद्वारे योग्य स्थळ त्वरित शोधण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. ८) तसेच आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे नोंदणीकृत सदस्याला स्वतःचा फोटो बदलणे, प्रोफाइल एडिट, प्रिंट करणे, तसेच पसंत असलेल्या स्थळांना पसंती दर्शवणे, पासवर्ड बदलणे, नूतनीकरण इत्यादी सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. या वेबसाईट मध्ये नोंदणी करण्याकरता लॉक डाऊन च्या काळात एक विशेष ऑफर म्हणून सरांनी एका वर्षाकरिता नाममात्र शुल्क म्हणून रु.५००/- ठेवले आहे हे नाममात्र शुल्क ठेवण्याचा उद्देश असा आहे की संपूर्ण वेबसाईटचे व्यवस्थापन करण्याकरिता जो काही खर्च करावा लागतो त्यादृष्टीने हे शुल्क ठेवण्यात आले आहे यामागे पैसा कमावणे हा उद्देश मुळीच नाही. पुनश्च: एकदा व्हाट्सअप ग्रुप मधील सर्व सदस्यांचे आभार व्यक्त करून त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपापल्या कुटुंबातील व आपले इतर नातेवाईक मंडळीतील उपवर-वधू मुला-मुलींची आणि तसेच इतर बहुसंख्य लोकांनी आपापल्या वरवधु मुला-मुलींचे वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज भरून जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करावी आणि लॉक डाऊन च्या या काळातील एक विशेष ऑफर म्हणून दिलेल्या संधीचा लाभ करून घ्यावा. याबाबत काही शंका-कुशंका असल्यास तसेच काही समज-गैरसमज असल्यास आपण थेट सरांशी त्यांच्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधू शकता. तसेच आपल्या सर्वांच्या सहकार्याने सरांच्या नवीन वेबसाईटच्या उपक्रमाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आतापर्यंत आपणाकडून प्रत्येक नवनवीन योजनेसाठी जो प्रतिसाद दिला गेला आहे तो असाच प्रतिसाद यापुढेही मिळत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो. अखेर आदरणीय वेरुळकर सरांनी केलेले कष्ट, त्यांची मेहनत, त्यांची जिद्द, आणि विशेष म्हणजे शांत आणि प्रसन्न चित्त व्यक्तिमत्व, त्यांचा जिव्हाळा, प्रेम, आणि सहनशील वृत्ती , या सर्वगुणसंपन्न अश्या त्यांच्या व्यक्तिम्त्वामुळे त्यांची निस्वार्थ सेवा सार्थक होऊन वेरुळकर सकल मराठा सोयरीक ही वेबसाईट उदयास आली आहे ही खूप मोठी क्रांती आहे. याबद्दल सरांचेआणि त्यांच्या कुटुंबीयांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देऊ या शेवटी चांगल्या विचाराने व चांगल्या आचाराने तसेच निस्वार्थपणे केलेली कुठलीही कार्य यशस्वी होतेच यात मुळीच शंका नाही. भाऊराव पाळेकर अकोला ७२७६५३५६७७

युवराज राऊत



से.नी. उपव्यवस्थापक (वि.ले.) म.रा.वि.वि.कं., नागपूर



श्री.वेरुळकर सर , नमस्कार, आपण सुरू केलेली सकल मराठा समाजाची साेयरीक ची वेबसाईट मी स्वतः निरीक्षण केले, अतिशय सुंदर, सुटसुटीत व सहज हाताळता येईल अशी ही वेबसाईट आहे. खरं तर खूप अभिनंदनीय आहे. यातून आपली समाजाप्रती असलेली आस्था व तळमळ दिसून येते. असेच शुभकार्य या पुढेही आपल्या हातून घडो अशा शुभेच्छा देतो व आपल्याला चांगले आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद !

Prin. Dr. Suresh Bathe, Buldana.





श्री.वेरुळकर सर , नमस्कार, दि. 1/10/2020 गुरुवार रोजी आपण लॉन्च केलेली सकल मराठा समाजाची साेयरीक ची वेबसाईट मी स्वतः निरीक्षण केली. अतिशय सुंदर, सुटसुटीत व सहज हाताळता येईल अशी ही वेबसाईट आहे. खरं म्हणजे आपली तब्येत बरी नसताना व सेवानिवृत्ती नंतर सुद्धा आपण समाजासाठी जोपासलेला हा छंद आणि ध्येय वेडेपणा निश्चितच अभिनंदनीय आहे. यातून आपली समाजाप्रती असलेली आस्था व तळमळ दिसून येते. शिवाय संपूर्ण संवर्गातील वधू-वरांना नोंदणी करण्याची आपण यामध्ये संधी दिली ही सर्वांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे ; पुन्हा म्हणजे आपण वेबसाईट नोंदणीची जी नाेंदणी शुल्क ठेवली ती अत्यंत माफक आहे. सर्वांना परवडेल अशी ती आहे. दिलेल्या नाेंदणी शुल्क मध्ये कितीतरी जास्त पटीने वधू-वरांना व त्यांच्या पालकांना माहिती मिळते. अशा प्रकारची वेबसाईट माझ्या अजून तरी निदर्शनास आलेली नाही. त्या मुळे तब्येतीची काळजी न करता आपण जी अपार मेहनत समाजातील तरुण वर्गासाठी घेतली ती निश्चितच वाखाणण्यासारखी आहे. असेच शुभकार्य या पुढेही आपल्या हातून घडो ह्या शुभेच्छा देतो व आपल्याला चांगले आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद !

भाऊराव पाळेकर, अकोला



अकोला



आदरणीय वेरुळकर सर सप्रेम नमस्कार आपण दिनांक १.१०.२०२० पासून "राजमाता जिजाऊ सकल मराठा सोयरीक" या व्हाट्सअप ग्रुपचे परिवर्तन करून "वेरुळकर सकल मराठा सोयरीक" या नवीन नावाने वेबसाईट तयार केली आणि एका नवीन सूर्योदयाचा शुभारंभ झाला. ही खरोखरच सर्व समाज बांधवांसाठी तथा ग्रुपमधील सर्व सभासदांसाठी हर्शो उल्हासित आणि मनोमन आनंद देणारी बाब आहे. ...... आणि सरांनी हा निर्णय घेणं हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप आवश्यक होते. त्यांनी ग्रुप मधील सर्व सदस्यांच्या भावनांची कदर करून योग्य असे पाऊल उचलल्या बद्दल सरांचे खूप खूप अभिनंदन. तसेच अजून एक महत्त्वाचे म्हणजे मी सरांना महिन्या दीड महिन्यातून एकदा तरी विनामूल्य ऑनलाईन मेळावा घ्यावा. जेणेकरून आपण सर्वजण एकत्र येऊ शकू. याबाबत त्यांनी लगेच होकार दर्शवून मनोगत व्यक्त केले याबद्दल सरांचे खूप खूप आभार मानावे लागतील. दिनांक १.१.२०१७ पासून ते आज जवळजवळ चार वर्षाच्या कालावधीत सरांनी ज्या ज्या नवनवीन योजना अमलात आणल्या त्याबाबतची त्यांच्या कार्याची सकारात्मक ऊर्जा मी बघितली. योग्य निर्णय क्षमता मी बघितली. आणि अगदी अंतर्मनातून उपवर-वधू आणि त्यांचे पालक लॉकडाऊन च्या काळात मेळाव्यामध्ये परिचय साठी उपस्थित आहे किंवा नाही, याची तीन-तीन चार-चार वेळा अगदी कासावीस होऊन कळकळीने दिलेली आर्त हाक मी ऐकली आहे. खरोखरच समाजासाठी किती त्यांना प्रेम, किती त्यांना जिव्हाळा, किती त्यांची आपुलकी याबाबतची साक्ष मी अनुभवली. खरच त्यांच्या निस्वार्थ सेवेला तोड नाही. मनात कुठलाही किंतु-परंतु न ठेवता त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य या कार्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावून त्यांना भरपूर मदतीची साथ देत आहे त्यामुळेच तर आज सुंदर अशी वेबसाईट उदयास आलेली आहे. आणि याच उद्देशाने मला सरांच्या कर्तृत्वाबद्दल असे आवर्जून सांगावेसे वाटते की, "कुठल्याही कार्याची दखल घेण्यासाठी आपले विचार सकारात्मक असले पाहिजे. सकारात्मक विचारच ते कार्य करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करीत असतात. सकारात्मक विचारांमुळे ते कार्य करण्यास आपल्याला चालना मिळते. नवनवीन कल्पना आपल्या मनात येतात. एक नवीन उमेद जागृत होते. आणि त्या उत्साहाच्या बळावर आपण एखादे अशक्य वाटणारी कार्य सुद्धा पूर्ण करू शकतो दुसरे असे की, जीवनात जोपर्यंत उत्साह आहे तोपर्यंत माणसाला कोणत्याच गोष्टीची भीती राहत नाही. तो त्या उत्साहाच्या जोरावर अथवा उत्सवाच्या बळावर जीवनात खूप मोठी कामगिरी पूर्ण करू शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे कार्य करीत असताना येणाऱ्या अडथळ्यांचा, तसेच परिस्थितीनुसार उद्भवलेल्या समस्यांचा सामना करणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. याकरिता सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच वाटचाल करावी लागते. चांगल्या गोष्टींचे अनुकरण करावे लागते. आणि कधीही हार न मानता पुढे आणि पुढे चालत राहणे यालाच कदाचित आयुष्य असे म्हणता येईल असो. आदरणीय प्राध्यापक महोदय, श्री.दत्तात्रय भाकरे अकोला यांनी त्यांच्या मनोगत मध्ये " एखादी व्यक्ती सेवाही धर्म हैं!" या उद्देशाने कार्य करीत असेल तर इतरांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांचे कौतुक करायला हवे हे त्यांचे वाक्य अधोरेखित करण्यासारखे आहे. आपण अतिशय सुंदर असे विचार व्यक्त केले आहे सर. याबाबत आपले खूप खूप अभिनंदन. आदरणीय श्री.गजाननराव काटे सर यांनी काल नुकतेच दिलेले मनोगत वाचण्याजोगे आहे. त्यामध्ये त्यांनी ज्या काही विशेष ठळक बाबी मांडल्या आहेत त्या अगदी वस्तुस्थितीवर आधारित आहे. वास्तव काय आहे ? हे त्यांनी दाखवून दिले आहे. सुंदर असे मनोगत त्यांनी व्यक्त केले आहे. याबाबत काटे सरांचे पण खूप खूप अभिनंदन . लॉकडाऊन च्या काळात एक विशेष ऑफर म्हणून सरांनी एका वर्षाकरिता नाममात्र शुल्क म्हणून रुपये ५००/- ठेवले आहे. परंतु या मागचा उद्देश कुणी समजून घेत नाही. नाममात्र शुल्क ठेवण्याचा उद्देश केवळ असा आहे की संपूर्ण वेबसाईटचे व्यवस्थापन करण्याकरिता जो काही खर्च करावा लागतो, त्यादृष्टीने हे शुल्क ठेवण्यात आले आहे. यामागे आदरणीय वेरुळकर सरांचा पैसा कमविणे हा उद्देश मुळीच नाही. "निस्वार्थ सेवा करीत राहणे आणि उत्तम सेवा प्रदान करणे" हेच सरांचे ब्रीद वाक्य कायम आहे. करिता सर्व सभासदांनी तथा समाजबांधवांनी आणि बहुसंख्य लोकांनी आपापल्या वरवधु मुला-मुलींचे ऑनलाइन अर्ज भरून नोंदणी करावी. "संगणक ही काळाची गरज आहे." याबाबत उपवर-वधू मुला-मुलींना प्रोत्साहन द्यावे. काही शंका-कुशंका असल्यास त्वरित दूरध्वनीद्वारे सरांशी संपर्क साधावा. विवाह योग्य जोडीदाराची निवड करण्यासाठी या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच आपण आपल्या नातेवाईकांना व मित्रमंडळींना सुद्धा याबाबत अवगत करावे आणि काही समज, गैरसमज असतील तर थेट सरांशी संपर्क करावा. आणि कुणीही ग्रुप सोडून जाण्याचा विचार करू नये अशी विनंती करण्यात येत आहे. ईश्वर आपणास व आपल्या कुटुंबास उदंड आयुष्य आणि सुदृढ आरोग्य प्रदान करो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. भाऊराव पाळेकर, अकोला

दिलीप गुलाबराव पाटील



अमरावती



आदरणीय श्री.गजाननराव काटे , रा.अकोला. सप्रेम नमस्कार , आपण "वेरुळकर सकल मराठा सोयरीक" च्या बाबत मांडलेले आपले मनोगत आजच वाचले, आनंद वाटला. त्या करीता सर्व प्रथम आपले अभिनंदन. आपण आपले मनोगत सुंदर तऱ्हेने मांडले, मांडलेल्या प्रत्येक गोष्टीत सुस्पष्टता व सत्यता आहे. वेबसाईट बनवण्याच्या मागे आपल्या सारख्या असंख्य निष्ठावंत सदस्यांची प्रेरणा व आर्शीवाद आहेत. आपल्या प्रेरणे मुळेच सकल मराठा समाजाच्या उत्थाना साठी वेबसाईटचे निर्माण श्री.षडानन वेरुळकर भाऊसाहेब करु शकले. या कार्यात भाऊसाहेबांचे जितके योगदान आहे त्याही पेक्षा अधिक श्रेय सौ.मुक्ताताई वेरुळकर व त्यांची तीनही मुलं चि.उत्कर्ष, चि.वैभव व चि.गौरव यांचे आहे. त्यांच्या अहोरात्र परिश्रमा मुळेच आपल्याला इतकी सुंदर वेबसाईट पहावयास मिळाली आहे. आता याचा उपयोग समाजाने घेतला पाहिजे तरच या परिश्रमाचे सार्थक होइल . धन्यवाद. दिलीप गुलाबराव पाटील अमरावती

गजानन काटे



अकोला



आदरणीय मराठा भुषण समाजसेवाव्रती सन्माननीय श्री.वेरुळकर सर सा. नमस्कार, काळाची गरज ओळखुन आपण वधु-वर परिचया करीता वेबसाईट सुरु केली त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा. मी गेल्या वर्षापासुन आपणास वेबसाईट सुरु करण्यासाठी विनंती करीत होतो, ते आपण दि. १ /१०/ २०२० गुरुवार रोजी साकारले आहे. व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून श्री गजानन महाराज कृपेने आपण आजपावेतो 300 पेक्षा जास्त लग्न जुळवली आहेत व 10 व्हाट्सअप ग्रुप वर 2500 च्या वर झालेली सभासद संख्या बघता हाताळणीच्या दृष्टीने वेबसाईट सुरु करणे गरजेचे होते. आपण वेबसाईट नोंदणी करीता एक वर्षा करीता नाेंदणी शुल्क रु.500/- ठेवले आहे, परंतु एकंदरीत वेबसाईटचा खर्च बघता खूपच नगण्य आहे. वेबसाईट तयार करण्यास जवळपास अडीच लाखा पेक्षा जास्त खर्च येतो त्याच बरोबर गुगल ला सुध्दा माहेवारी भाडे रु.१० हजार पेक्षा अदा करावे लागतात. कॉम्प्युटर ऑपरेटर ला कमीत कमी रु.15000/- वेतन द्यावे लागते. वरील बाबी लक्षात घेता नाेंदणी शुल्क रु.500/- अत्यंत माफक आहे. जेवढ्या खाजगी विवाह जुळवणी संस्था आहेत त्यांची नोंदणी शुल्क तीन महिन्याकरिता कमीतकमी रु. 3000/- आहे व तीन महिन्यानंतर पुन्हा रु. 3000/- भरावे लागतात. आपण कमी नाेंदणी शुल्क ठेवल्यामुळे आपला होणारा खर्च सुध्दा भागणार नाही. आपण नेहमीच सांगत आला आहात की आपण हे समाज कार्य, छंद म्हणून जोपासत आहात. ग्रुपवरील समाज प्रेमी सर्व सदस्यांना विनंती करण्यात येते की आपल्या लग्नाळू मुला-मुलींची नोंदणी करुन ह्या समाज सेवेच्या उपक्रमास हातभार लावावा ही नम्र विनंती. धन्यवाद ! आपलाच गजानन काटे, अकोला

Page 2 of 15