मनोगत

एस.एस.धाेत्रे



नाशिक



वेरुळकर सर आपल्या Whats app ग्रुप माध्यमातून आतापर्यंत ९० लग्न जुळलीत.आपण मराठा समाज बांधवांसाठी फार छान सामाजिक कार्य करीत आहात जे खूप वाखाणण्या जोगे आहे.आपणास शतशः धन्यवाद ! समस्त मराठा बांधव आपले फार आभारी आहेत ! शुभेच्छुक - एस.एस.धाेत्रे, नाशिक

अरूण महल्ले



अकोट जि.अकोला



वेरुळकर सरांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा! राम राज्यात सितामाईला स्वयंवरासाठी रथीमहारथी एकत्र बोलावून स्वयंवर करावे लागले ! पण आज आपण सोशल मिडीयाचा उपयोग करून अनेक सितामाईचे स्वयंवर एका क्लिक वर आणले समाज आपले हे कार्य कदापि विसरू शकत नाही...माझे कडून शुभेच्छा की, प्रभु रामचंद्र आपणास भरपुर आयुष्य व कार्य करण्यासाठी उर्जा प्रदान करो ..

नरेंद्र कुचे



अमरावती /डोंबिवली, ठाणे.



मी नरेंद्र कुचे बाेलताेय ! मा.वेरूळकर सर, आपण Whats app ग्रुप तयार करून खुप चांगले कार्य करत आहात. Bio-data आणि फोटो एकत्र करून पोस्ट करण्याची तुमची कल्पना तर खूपच नाविण्यपूर्ण आहे. एवढी मेहनत आपण घेत आहात ही तर खूप मोठी समाजसेवा आहे. 85 लग्न ह्या ग्रुप मधून जुळविण्याचं कार्य आपण करून दाखविले. 100 लग्नाचे उद्दिष्ट आपण लवकरच पूर्ण करणार ह्यात शंका नाही. विवाह मंडळ Rs. 1500 ते 2500 चार्ज करतात पण त्यांच्या कडून काहीच सहकार्य मिळत नाही. आपणास ह्या कार्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नरेंद्र कुचे अमरावती /डोंबिवली, ठाणे.

बी.एन.गावंडे



रा.मामुलवाडी ता. नांदुरा जि.बुलडाणा ह.मु.साेलापूर.



जय श्रीराम ! वेरुळकर परिवार,आपण दोघे ही ऊभयता मराठा समाज या भुतलावर एक संघ राहावा तो पण सामाजिक वैवाहिक बंधनात टिकुन राहावा. हे विनामुल्य समाज कार्य तुम्ही करीत आहात हे कार्य साेपे नाही ! आपल्या हातात सोशल मिडीया आला व आपण मराठा वैवाहिक जीवन मार्ग सुकर केला व त्याचे सोने केले एक व्यक्ती काय करु शकते ! हे तुम्ही समाजाला दाखवुन दिले आपल्या अपार कष्टाला अपार प्रेम लाभो ! हिच प्रभु रामचन्द्र जन्म दिनी प्रार्थना करताे ! पुनश्च धन्यवाद !

निलेश सत्यवान भालतडक M.E.(E&TC)



सातळी ता.जळगांव (जामाेद) जि.बुलडाणा



मी पाहतोय तेव्हा पासून माझ्या निदर्शनास असे आले की एवढे चांगल्या प्रकारे आपण ग्रुप चालवत आहात आणि तेही systematic way ने..अगदी प्रोफेशनल..... कुठलीही कुणाची चुकीची कॉमेंट पण नाही. (only admin can send the post) खूपच छान. सर तुम्ही हाती घेतलेला हा समाजकार्याचा वसा खूप महत्वाचा आहे. कारण हे साधारण काम नसून हे दोन जीवांचे मनोमिलन, नवीन संसाराची सुरुवात, म्हणजेच दोघांचाही आयुष्याचा (करियर पेक्षाही महत्वाचा) टर्निंग पॉईंट आहे.आणि यामध्ये चूक चालत नाही.एवढ संवेदनशील हे काम आहे. आनंदाची आणि नवलाची गोष्ट अशी की आपण स्वतःचे सर्व संभाळून हे मौल्यवान कार्य करत आहात. तुमचं हे कार्य असंच वाढत राहो. व्रुध्दींगत होत जावाे आणि तुमच्या कार्याची नावलौकीक्ता सर्वदूर पसरत जावाे ही शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना. आम्हाला वेळोवेळी असलेल्या तुमच्या सहकार्या बद्दल तुमचे कोटी कोटी आभार. आपला स्नेही निलेश सत्यवान भालतडक M.E.(E&TC) सत्यवान पाटील (भालतडक)सातळी ता.जळगांव (जामाेद) जि.बुलडाणा यांचा चिरंजीव

विलास रामजी उपासे



देशमुख नगर, पुसद



नमस्कार ! आधुनिक विज्ञानाची देण असलेल्या सोशल नेटवर्किंग चा विधायक व सामाजिक कार्यासाठी उपयोग करणाऱ्यां पैकी एक म्हणजे श्री वेरुळकर सर ! Whats app या ग्रुपच्या माध्यमातून ते करत असलेल्या समाजकार्या साठी त्यांना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा ! शुभेच्छुक - विलास रामजी उपासे, ( जलसंपदा विभाग - स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ) देशमुख नगर, पुसद

श्री संजय मधुकरराव काळणे, शिक्षक



रा.आगर ता.जि.अकोला ह.मु.शिक्षक काॅलनी, मलकापुर,अकोला.



नमस्कार ! वेरुळकर सर, आपण निवडलेला मार्ग हा आज काळाची गरज आहे. या धकाधकीच्या जीवन क्रमात ज्यांचा मुलगा कींवा मुलगी उपवर - उपवधू आहेत.त्या वडीलांना हा खूप सोईचा मार्ग आहे व ही सेवा समाज कार्य म्हणून आपण निस्वार्थ करित आहात सर तेव्हा या कार्यास माझे दंडवत ! आपला हितचिंतक - श्री संजय मधुकरराव काळणे, शिक्षक

प्रा.श्रीधर तेजराव बाठे



रा.मेामिनाबाद ह.मु.नांदुरा जि. बुलढाणा



नमस्कार ! मा.श्री.एस.आर.वेरुळकर,सरांच सोशल मिडीया चा योग्य वापर करून विनामुल्य सोयरीक जुळवण्याच हे महान कार्य समाजात एक मोठा आदर्श ठरला आहे ..अशा प्रकारे समाजासाठी कार्य करणारे घटक आणि त्यांना प्रोत्साहन देणारे घटक ही काळाची एक गरज आहे .. श्री एस.आर.वेरूळकर सर यांच करावं तितक कौतुक कमीच आहे ..आपल्या कार्याला सलाम सर !

Page 15 of 15